भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जुन्या सातारा भागात गुढीपाडवा आणि मरीमाता देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या महोत्सवाला गालबोट लागले आहे . ४-५ लोक चिरडले गेले असून २ लोकांचे पायांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते. यामध्ये १ व्यक्ती दगावल्याची देखील बातमी आहे.मात्र,अधिकृत रित्या पोलीस विभागाकडून या घटनेस दुजोरा मिळू शकलेला नाही.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मरी मात्रा यात्रेत बारागाड्या ओढत असताना चेंगराचेंगरी मध्ये गाडी ओढणारे सुतार गल्लीतील गिरीश कोल्हे (वय ३९) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्यमध्ये माजी नगरसेवकाचे बंधू असल्याचे कळते.