भुसावळ ः प्रतिनिधी
शहरातील मोहित नगर परिसरातील रहिवासी तथा येथील रिदयम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन रामचंद्र पाटील(वय 38) यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.17 जून रोजी सकाळी मोहित नगरातील राहत्या घरुन निघेल. डॉ.नितीन पाटील हे निष्णांत भूलरोग तज्ञ होते.
डॉ.पाटील यांना कोरोना काळात केलेल्या रुग्णसेवेबद्दल मराठी पत्रकार संघातर्फे मुंबई येथे गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना खान्देश रत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. डॉ.नितीन पाटील यांच्या अकस्मात जाण्याने भुसावळ परिसरातील वैद्यकियसह आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते अंत्यत मितभाषी व मनमिळावू म्हणून ओळखले जात होते.