भुसावळच्या तिघांनी पूर्ण केली टाटा अल्ट्रा ३५ किमी रन

0
88

भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या विजय फिरके,विजय पाटील व उमेश घुले या धावपटुंनी लोणावळा येथे संपन्न झालेल्या टाटा अल्ट्रा ३५ किमी रन या स्पर्धेत यश संपादन केले. त्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तिघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
रात्रीच्या काळोखात ३ वाजता लोणावळ्याच्या सुनील वॅक्स म्युझिअम येथून स्पर्धेस सुरुवात झाली तर तब्बल ८५० मी उंचीवरील अवघड असा घाट धावत जाऊन तिकोना किल्ल्याजवळील जवन तुंगी मार्गापर्यंत नियोजित वेळेत पोहचायचे होते. परंतु अतिशय निर्धाराने तीनही धावपटुंनी हा कठीण असा मार्ग धावत जाऊन पूर्ण केला. याप्रसंगी आपण मागील काही महिन्यांपासून घेत असलेली मेहनत तसेच प्रवीण फालक सर व डॉ तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळाले अशी कृतज्ञता तीनही धावपटुंनी बोलून दाखवली.
यावेळी मैदानावर डॉ नीलिमा नेहेते यांच्या हस्ते विजय फिरके यांना गौरविण्यात आले तर प्रवीण वारके यांनी विजय पाटील व रणजित खरारे यांनी उमेश घुले यांचा सत्कार केला. याप्रसंगी शहरात प्रथमच महिला क्रिकेट सामने आयोजित केल्याबद्दल भुसावळ रनर्सच्या नियमित धावपटू आरती चौधरी यांचे देखील अभिनंदन करण्यात आले व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पूनम भंगाळे, प्रिया पाटील, पूजा बलके, मिनी जोसेफ,मंजू शुक्ला, ब्रिजेश लाहोटी,अंकित पोतदार, राजेंद्र ठाकूर, राकेश पाटील, सारंग चौधरी, विलास पाटील, विजय चौधरी, प्रवीण पाटील आदी धावपटू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here