Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»भीषण अपघात! कंटेनरला ट्रकने दिली धडक; ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश
    मुंबई

    भीषण अपघात! कंटेनरला ट्रकने दिली धडक; ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश

    SaimatBy SaimatAugust 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह प्रतिनिधी ठाणे

    Thane News : अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

    ठाणे – ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने जोरदार मागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ घडली. या अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून रस्ता मोकळा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले.

    ट्रक चालक सोलकर हे ठाण्यातील वागळे इस्टेट, सीपी तलाव येथे राहणारे आहेत. ते आपला रिकामा ट्रक घेऊन तीन हात नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गे भिवंडी पडघा येथे जात होते. कॅडबरी जवळ आल्यावर त्यांनी आपल्या ट्रकने समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनर मागून जाऊन धडक दिली. तो कंटेनर वाशीहून भाईंदरला १५ टन बर्फाच्या लाद्या घेऊन जात होता. या अपघातात ट्रक चालक ट्रकमध्ये अकडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिस या विभागांनी धाव घेतली. तसेच अडकलेल्या सोलकर यांना आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तसेच नौपाडा पोलिसांनी ट्रक क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला केला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.