जळगावः प्रतिनिधी
येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभे तर्फे वन्य प्राणी पासुन शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासठी धरणे आंदोलनाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.
विखरण चारेटकी तालुका एरंडोल परिसरातील शकतकऱ्यांचय्ा पिकांची नासाडी रोही नीलगायी रानडुक्कर करीत असतात ती थांबवावी, वनखाते जमीन ते शेतकऱ्यांची जमीन दरमय्ान तारेचे कुंपण तयार करवे व वन्य प्राण्यांना पाण्याची चाऱ्याची व्यवस्था करून त्यांचा बंदोबस्त करावा… नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांचे नुकसानीचा पंचनामे करून एमएसपी प्रमाणे नुकसान भरपाई द्या आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार निधीतून शेतकऱ्यानां मदत करावी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कौन्सिल वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दि.25 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, अमृत महाजन, संजय बागड, छोटू मिस्तरी, विठ्ठल बडगुजर, शेतकरी प्रतिनिधी अनिल महाजन, महेंद्र महाजन, रतिलाल महाजन, सुभाष महाजन, गंभीर महाजन, गुलाब महाजन, रघु पाटील, पंडित महाजन,छोटू पंडीत, सुपडू महाजन, छोटू मिस्तरी, रावा चौधरी, पुरूषोत्तम महाजन, सोपान मिस्तरी, उमराव महाजन, कैलास रामदास, रघुनाथ महाजन, रघुनाथ पाटील, आत्मराम आहेर, दिलीप चोधरी, हिम्मत महाजन, किशोर महाजन, इंधा चिंतामण आदंची उपस्थिती होती.