भाटिया  कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ धरणगाव येथे भाजपातर्फे  मूक मोर्चा

0
57

धरणगाव प्रतिनिधी 

शहरातील भाटिया  कुटुंबाला जळगाव या ठिकाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याप्रकरणी येथे भारतीय जनता पार्टी तर्फे आज  सकाळी बालाजी मंदिरापासून ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले .
मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते तसेच धरणगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये भाटिया समाजाचे कार्यकर्तेही फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चामध्ये महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. तसेच निरपराध कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोर्चाच्या वतीने संबंधित शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आले.

मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या सभेमध्ये धरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक ललित येवले यांनी मनोगत व्यक्त केले की, माझ्याकडे सुद्धा गुलाबराव वाघ यांनी मला मारण्यासाठी चाळीस-पन्नास गुंड माझ्या घरी पाठवले आले होते. त्यावेळेला मला माझी आई व माझी पत्नी सुद्धा रडत होती व माझा लहान मुलगा सुद्धा  रडत होता धरणगाव शहराची शिवसेनेच्या लोकांची अल्प अल्पसंख्यांक समाजावर हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही शिवसेनेच्या विरोधात बोलत असशील यांच्यावर अशाच प्रकारे  त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतात परंतू ललित येवले म्हणाले मी अशा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला घाबरत नाही ज्या ठिकाणी शिवसेना अन्याय दादागिरी करेल त्या त्या ठिकाणी मी त्यांना विरोध करत राहील अन्यायग्रस्त महिला गौरव भाटिया यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली त्याबाबत सविस्तर माहिती दिली एका महिलेला कशा पद्धतीने शिवसेनेचे पदाधिकारी मारहाण करत होते. मला माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीला कशा पद्धतीने मारहाण केली याबाबत सविस्तर माहिती दिली अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्यात आला.

 

तरीही पोलिसांनी अद्याप पर्यंत  पाहता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नाही परंतु उलट आमच्या कुटुंबात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. तरी तो गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांनी यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले .शिवसेना ला वाटते आमचा मुख्यमंत्री आहे आम्ही काहीही करू शकतो परंतु ही दादागिरी आम्ही चालू देणार नाही तसेच भाटिया कुटुंबाच्या मागे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभे आहोत तसेच जळगाव जिल्हा ओबीसी समाजाचे अध्यक्ष एडवोकेट संजय महाजन यांनी आतापर्यंत धरणगाव शहरात होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली तसेच धरणगाव शहरातील अन्यायग्रस्त कुटुंब गाव सोडून जात होते परंतु आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला तुमच्यावर यापुढे कोणत्याही अन्याय होणार नाही अशी कुटुंबाला खात्री दिली.

सभेचे सूत्रसंचालन नगरपालिकेचे गटनेते कैलास माळी यांनी सूत्रसंचालनात धरणगाव शहरातील शिवसेना कशा पद्धतीने धरणगाव शहरातील लोकांवर अन्याय केलं याबाबत सविस्तर माहिती दिली मोर्चा यशस्वी करण्यासाठी धरणगाव शहरातील धरणगाव भाजपचे अध्यक्ष दिलीप भाऊ महाजन तसेच कन्हैया रायपूरकर तसेच विशेष परिश्रम घेतले त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने व कुटुंबाच्या वतीने धरणगाव येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश अहिरे यांना मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी केली की अन्यायग्रस्त कुटुंबाला झालेल्या अन्यायाबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा तसेच अन्यायग्रस्त कुटुंबावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पीसी पाटील जळगाव जिल्हा समाजाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.

संजय महाजन नगरसेवक ललित येवले, माधुरी अत्तरदे, गौरी भाटिया, भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य शिरीष  बयस , शहराध्यक्ष दिलीप  महाजन, धरणगाव भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस कनया  रायपूरकर, नगरसेवक शरद कंखरे, नगरसेवक कडू बयस, भूषण कंखरे, अ‍ॅड. वसंतराव भोलाने, सचिन पाटील इत्यादींनी निवेदन दिले आभार प्रदर्शन कैलास माळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here