जळगाव ः प्रतिनिधी
एका इंग्रजी चॅनेलवर ज्ञानवापी फाईल्स हा चर्चेचा कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमात उपस्थित दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या श्रीमती नपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या व त्यांची पत्नी हजरत आयशा यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून सर्व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी नको शर्मा यांच्या विरोधात भादवि 295, 153, 500, 52 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षकांची प्रतिनिधी गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार दिली व या चर्चेचा व्हिडिओ पेन ड्राईव्ह पुराव्याकामी सादर केलेला आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक गृह संदीप गावित यांनी शिष्टमंडळास दिले.या शिष्टमंडळात एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समीर सय्यद, जामा मजीद ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद अमित मुस्लिम मनिष शहा, आयुष्या पुरेशी बिरादरीचे याकूबखा मकबूलखान व येथील समीर शेख यांचा समावेश होता.