जळगाव ः प्रतिनिधी
खासदार सुप्रियाताई सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे.त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे. असे असतांना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी “ घरी भाकरी थापा , स्मशानात जा… असे बेताल व निंदनीय वक्तव्य केलेले आहे , असे वक्तव्य करून पाटील यांनी सुप्रिया सुळे व समस्त नारीशक्तीचा अपमान केलेला आहे.
या उलट चंद्रकांत पाटील यांचे महाराष्ट्रात काहीच योगदान नाही, म्हणूनच स्वतःच्या कोल्हापूर मतदारसंघात निवडणूक येण्याची देखील त्यांची लायकी नाही. एका महिलेला डावलून राजकीय अन्याय करत कोथरूड मतदार संंघात महिलेला डावलून चंद्रकांत पाटील निवडूून आले आहेत.तरीही त्यांनी सुप्रियाताईंबद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत गैर व खेदजनक आहे .
सदर वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला व चंंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी आमदार मनीष जैन, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक जिल्हा अध्यक्ष रविंद्र नाना पाटील , अरविंद मानकरी, रिंकू चौधरी , सुशील शिंदे , अमोल कोल्हे, राजू मोरे,किरण राजपूत,अंकिल पटेल, रहीम तडवी , मजहर पठाण , सौ. आशा अंभोरे , सौ. जयश्री पाटिल , सौ. विमल मोरे,अर्चना शिंदे ,अशोक सोनवणे, रमेश बाहरे, नईम खाटिक , राहुल टोके,किरण चव्हाण, जितेंद्र बागरे, राजा मिर्झा आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
