भुसावळ : प्रतिनिधी
येथील भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी शहरातील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले लव वामन झाडगे यांची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक नुकतीच भाजपाचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, भाजपा ओबीसी सेलचे अजय भोळे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, सतिष सपकाळे, रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत शहरातील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले लव वामन झाडगे यांच्या कार्याची दखल घेत सहकार क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या शहराध्यक्षपदी यांची वर्णी लावण्यात आली. यावेळी त्यांना सदर निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यानिवडीबद्दल लव झाडगे यांच्यावर माजी मंत्री आ.गिरीश महाजन, माजी मंत्री आ.संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, अजय भोळे, परिक्षित बऱ्हाटे यांच्याकडून व समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.