भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

0
15

शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने  शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद, केंद्रात २ मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपद असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या २५ टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात काही आमदार सहभागी झाले आहेत. हे आमदार गुवाहाटीत हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या आव्हानानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा,असं आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमधून केलंय. गेल्या अडीच वर्षात केवळ घटकपक्षांचाच फायदा झाला मात्र यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here