भाग्यश्री पाटीलने पटकावला प्रथम क्रमांक

0
100

जळगाव ः प्रतिनिधी
वेस्टर्न आशियाई यूथ रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील प्रथम आली. मालदीव फिडे अंतर्गत 18 वयोगटातील मुलींच्या वेस्टर्न आशियाई यूथ रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत पाचोऱ्याची एम. एम. कॉलेजची विद्यार्थिनी भाग्यश्री हिने 7 पैकी 6 गुण घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

या खेळात कजकस्थान व उझबेकिस्तानची अव्वल खेळाडू असतानादेखील भाग्यश्रीने 1 गुण जास्त मिळवून विजेती ठरली. भाग्यश्रीचा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, एम. एम. कॉलेजचे चेअरमन संजय वाघ, प्रा. स्वप्निल पाटील यांनी गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here