Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी
    जळगाव

    भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी

    SaimatBy SaimatFebruary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव : प्रतिनिधी
    जळगाव ते शिरसोली रोडवर असलेल्या सेंट टेरेसा स्कूलजवळ भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बापू दौलत सोनवणे (वय ४५) आणि त्यांचा सहकारी चंद्रकांत विठ्ठल मोरे दोन्ही रा. दुध फेडरेशन, जळगाव हे दोघे आचारीचे काम करतात. २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी (एमएच १९ एमएच ९३४०)ने शिरसोलीकडून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बापू सोनवणे आणि चंद्रकांत मोरे हे दोघेजण जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चारचाकी वाहन चालका विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोली हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव क्रिकेट उत्सव: JCL 2026 – पर्व 2; T20 थरार घेऊन येणार, स्थानिक खेळाडूंना सुवर्णसंधी

    March 20, 2026

    Dharangaon : धरणगाव तालुक्यातील जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीवर गुन्हा नोंद

    March 20, 2026

    Jalgaon : आर आर विद्यालयात गुढीपाडवा उत्सव: मराठी नववर्षाचे स्वागत ‘स्वररंग’ कार्यक्रमाने

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.