भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

0
34

जळगाव प्रतिनिधी

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मोहाडी गावाजवळ घडली. या संदर्भातील वृत्त असे की, सुजय गणेश सोनवणे (वय१३) हा मुलगा आज दुपारी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. याप्रसंगी गावाजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here