बोदवड रेल्वे स्टेशनवर “रेल रोको आंदोलन”

0
33

साईमत बोदवड प्रतिनिधी

रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर बंद झालेल्या व नविन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी बोदवड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात होता. रिक्षा स्टॉप जवळच प्रवेश मार्ग बंद करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस तैनात होते. प्लॅटफॉर्म तिकिट काढल्यावरही आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी बाहेर रिक्षा स्टॉप जवळच रोखून धरले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल आंदोलना स्थळी दाखल होताच रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांवरील दबाव पाहता आमदार पाटील यांनी भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत , बंदोबस्त मोडून काढत आंदोलनकर्त्यांना सोबत घेत रेल्वे स्थानकावर दाखल झाले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासहित आंदोलन कर्त्यांनी रेल्वे गेट मधिल लोहमार्गावर रेल रोको आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या दिव्यांग बांधवांसोबत आमदार चंद्रकांत पाटिल , प्रवासी संघटना , व्यापारी संघटना, रिक्षा युनियन , विद्यार्थी वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. पंधरा दिवसांत ठोस तोडगा न निघाल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here