बोदवड प्रतिनिधी
बोदवड येथील जामनेर भुसावळ रोड वरील महात्मा फुले चौकात. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा लवकरात लवकर बसवण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी बोदवड तालुका यांच्यावतीने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष आनंद भाऊ पाटील यांनी निवेदन कर्ते यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू अशी ग्वाही निवेदन करतांना दिले. निवेदन देतांना संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष दीपक एकनाथ खराटे, शहराध्यक्ष पवन नंदू पाटील, आकाश माळी ,आनंद माळी, वैभव माळी, सागर तेली, गोपाल साळुंखे, गणेश भाऊ सोनोने उपस्थित होते.