साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी :-
येथे दिनांक २४/८/२०२२ पासून ते २९/८/२०२२ या सहा दिवसामध्ये माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बेरोजगारानी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन रामदास पाटील यांनी केले आहे.
भारत सरकारच्या PASARA एक्ट -2005 च्या अंतर्गत प्रशिक्षण देऊन S.S प्रा .लिमिटेड या ISO मान्यताप्राप्त कम्पनीतर्फे कायमस्वरूपी नौकरीसाठी भर्ती मेळाव्याचे आयोजन केले आहे , भर्ती होणाऱ्या तरुणांना S.S. प्रा .लिमिटेड तर्फे सिलेक्शन करूँन नौकरी उपलब्ध केली जाणार असून , प्रोविडेंट फण्ड व सम्पूर्ण परिवारस मेडिकल सुविधा ,ग्रेचुटी ,PF पेंशन ,विधवा पेंशन ,अनाथ पेंशन ,वेळोवेळी प्रमोशन व योग्यतेनुसार भत्ते सुद्धा दिले जाणार आहे. मेळाव्यात सहभागासाठी विद्यार्थी 10 वी पास आसावा ,ऊँची -165 सेमी ,वजन कमित कमी 45 किलो आसावे , वय -19 वर्ष पूर्ण आसावे ,युवक मेडिकल फिट आसावा असे नियम देण्यात आले असून , भर्तीमधे सिलेक्शन झाल्यानंर SS प्रा .लिमिटेड तर्फे प्रशिक्षण दिले जाईल.
भर्तीमधे सम्पूर्ण महाराष्ट्रातील तरुण भाग घेऊ शकतात.SS प्रा .लिमिटेड ही पहिली महारास्ट्रियन सिक्योरिटी कम्पनी आहे जी महारास्त्रातील तरुनान्ना प्रशिक्षण देऊन नौकरी देते. त्यात मुक्ताईनगर मतदारसंघातील तरुणांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.भरती ही पारदर्शन पद्धतीने होणार आहे तरी बाहेरील एजेंट पासून सावध राहावे आसे आव्हाहन कमांडेंट कार्यालय पुणे तर्फे करण्यात आली आहे