बोदवड ः प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर लोकसभा क्षेत्राच्या कार्यतत्पर, खासदार श्रीमती रक्षातार्इं खड़से यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,आतीषबाजी,अवाजवी ख़र्च न करता 13 में रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी रुग्णांना फळ वाटप करून सामाजीक उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, मधुकर पारधी, भाजपा सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रोहित अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस उमेश पाटील, शहराध्यक्ष अभिषेक झाबक, सरचिटणीस सचिन जैस्वाल, सोशल मिडिया सहसंयोजक सागर गंगतीरे, अमोल जंजाळ आदी कार्यकर्ते व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.