Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»बोदवड»बोदवड तालुक्यात गतिमंद तरुणीवर बलात्कार
    बोदवड

    बोदवड तालुक्यात गतिमंद तरुणीवर बलात्कार

    saimat teamBy saimat teamJanuary 1, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी
    तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय गतीमंद तरुणीवर त्याच गावातील तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात घडल्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.
    याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय तरुणी गतीमंद असून ती आईवडिलांसोबत रहिवासाला आहे. गतीमंदपणा असल्याने तरुणी वेडसरपणा करते. या कारणामुळे तिच्या वडिलांनी तिला आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर खाटेला दोरीने बांधून ठेवले होते. २६ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस पिडीत तरुणीच्या घरात कुणीही नसतांना त्याच गावातील एका तरुणाने तरुणीच्या वेडसरपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पिडीत तरुणीच्या आईवडिलांना समजला. तसेच सदर संतापजनक प्रकार गावातीलच राजु सुकदेव वाघ याने केला असल्याचेही त्यांना समजले. याप्रकरणी त्यांनी बोदवड पोलीसात जात घडलेला प्रकार कथन करून पिडीतच्या आईच्या फिर्यादीवरून राजु सुकदेव वाघ या तरुणाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि भाईदास मालचे हे करीत आहेत. दरम्यान, संशयीत आरोपी राजु वाघ हा फरार झाला असून पिडीतेस आज वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे तपासी अधिकारी पोउनि मालचे यांनी ‘साईमत’शी बोलतांना सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.