बोदवड सुहास बारी
शिवसेना ,भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी,भारतीय जनता पक्ष, नगराध्यक्ष बोदवड, व्यापारी संघटना बोदवड, डॉक्टर असोसिएशन बोदवड, किसन एकता संघ, दिल्ली ,स्वामी विवेकानंद बाहुउद्देशी संस्था बोदवड च्या वतीने
आम्ही सदर आमच्या राजकीय पक्षाच्या तसेच संस्थेमार्फत बोदवड परिसरातील नागरीकांची गोर – गरीब गरजुंची कामे करण्याचा प्रयत्न करत असतो . लोकांची कामे करतांना बऱ्याच वेळेस आमचे तहसिल कार्यालय बोदवड येथेही जाणे येणे असते काही दिवसांआधी बोदवड तहसिल कार्यालयात तहसिलदार योगेश्वर टोंपे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे . तहसिलदार योगेश्वर टोंपे बोदवड तहसिल कार्यालयात , तहसिलदारपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या दालनात प्रत्यक्ष जाण्याचाही बऱ्याच वेळेस आम्हाला योग आला प्रत्येक वेळेस सदर तहसिलदार योगेश्वर टोपे यांनी आम्हाला आस्थेने विचारपूस करुन तहसिल कार्यालयातुन कामकाज होण्यास काही अडचणी येत असल्यास त्या प्रत्यक्ष निवारण्यासाठी प्रत्येक वेळी हमी दिली आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही लोकभिमुख समस्या घेवून गेलो असलो तरी त्यांनी प्रत्येक वेळेस गरजु , होतकरु लाभार्थी , शासकीय लाभांपासून वंचित राहणार नाही याची नेहमी काळजी केल्याचे आम्ही प्रत्यक्ष बघीतलेले आहे दरम्यान त्यांनी कोणत्याही कामाबद्दल लाच , मोबदला , लाभ , बक्षीस मागीतलेले आम्ही बघीतले नाही तसेच आमच्या ऐकीव माहितीत सुद्धा नाही . नुकताच लाजलचुपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत त्यांच्या विरुद्ध कार्यवाही झालेली आहे. सदर तहसिलदार योगेश्वर टोंपे हे भ्रष्ट मार्गाचा कोणताही अवलंब करत नव्हते व नाही अशी आमची प्रामाणिक समजूत/मत आहे.
एखादया प्रामाणिक अधिकार्याविरुद्ध अशा प्रकारची कार्यवाही होऊन त्यांचे प्रशासकीय जीवन संपू नये हा आम्ही देत असलेल्या प्रस्तुत पत्रात उद्देश आहे.तक्रारदार विठ्ठल पाटील जळगाव यांचे बाबत आम्ही माहिती मिळवली असता सदर व्यक्ती वाळूचा बेकायदेशीर व्यवसाय करीत असून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही होण्याआधी तो कर्त्यव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी विरुद्ध बनावट प्रकरन स्वतः तयार करून चांगल्या अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही आमच्या खात्रीशिररित्या माहितीस झालेले आहे.
तरी आपणास निवेदन की बोदवड तहसील कार्यालयातील तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांचे विरुद्ध काहीतरी अपराधिक षडयंत्र झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने त्यांच्या विरुद्ध होत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जळगाव यांच्या कार्यवाहीत स्वात तुमचे पातळीवर व्यक्तिगत लक्ष घालावे जेणे करून एखांद्या प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यास त्यांचे काही न करता त्यांचे विरुद्ध खोटे प्रकरण चालवण्याचा संदेश समाजात जाईल आपल्या स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात येईल अशी सर्व राजकीय पक्ष्यांची अपेक्षा आहेत
नगराध्यक्ष आनंदा पाटील,कांग्रेस तालुका अध्यक्ष भारत पाटील,बी जे पी तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी,व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजेश नानवाणी,किसन एकता संघाचे विनोद पाडर,डॉक्टर असोसिएशनचे डॉ सुधीर पाटील, स्वामी विवेकानंद संस्थेचे गोपाळ पाटील,माजी नगराध्यक्ष सईद दादा बागवान, उपनागध्यक्ष संजय गायकवाड,शिवसेना शहरप्रमुख राहुल शर्मा,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील,नगरसेवक प्रिंतेश बरडीया , माजी नगर सेवक धनराज गंगतिरे, सरपंच कुऱ्हा हरदो भगवान महाले,सुभास देवकर,तानाजी पाटील,अमीन मण्यार,पप्पू भांज्य,