बेशिस्त वाहनचालकांकडून साडेसहा लाखाचा दंड वसूल

0
5

वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे बसणार चाप

साईमत।मालेगाव।प्रतिनिधी।

शहरात विनाहेल्मेट, विना लायसन्स, फोनवर बोलणे, विना सिटबेल्ट, अवजड वाहने, बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १ जानेवारी २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाहतूक शाखेने १३ हजार ५२७ वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईपैकी १६९ वाहनांकडून दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेला ६ लाख ४४ हजार ६०० रुपये दंड जमा झाला आहे. शहरात बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

येथे मनमर्जीने वाहने चालविणाऱ्यांवर ई-मशिनद्वारे ऑनलाईन दंड दिला जातो. ५०० रुपयांपासून ते २ हजारापर्यंत दंड ठोठावला जातो. येथे दुचाकी, चारचाकी, तीनचाकी रिक्षा, अवजड वाहने, अवैध पार्किंग, विनाहेल्मेट, मोबाईलवर बोलणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे असे प्रकार सर्रासपणे घडतात. यामुळे अपघात होतात. अशा वाहनचालकांवर येथील वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. १ जानेवारी २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत १३ हजार ५२७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १६९ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. नागरीक स्वत:हून वाहतूक शाखेस व वाहतूक पोलिसांकडे ऑनलाईन व रोख स्वरुपात दंड भरत आहेत. त्यामुळे येथे ९ महिन्यात ६ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा दंड जमा झाला आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेचा ताण

वाहतूक शाखेकडे अपूर्ण कर्मचाऱ्यांवर शहराचा अतिरिक्त भार येत आहे. येथील मोसम पूल चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच सटाणा नाका, सोमवार बाजार, नवीन बसस्थानक, दरेगाव नाका, मनमाड चौफुलीसह अनेक भागात वाहतूक पोलिसांची गरज आहे. येथील वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याने आहे त्याच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येतो. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here