धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंप्री खु. येथील राकेश भाईदास बारेला (वय २०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ एप्रिल रोजी पिंप्री खुर्द येथून त्यांची बहीण मुंगळी भाईदास बारेला (वय ७) हिचे अज्ञात इसमाने अपहरण केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी शोधासाठी मध्यप्रदेशसह विविध भागात पथके रवाना केली आहेत.