पारोळा शहर प्रतिनिधी :
पारोळा शहरातील श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो. यु. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून यात भाऊ बहीण संयुक्त प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पारोळा शहरातील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो.यु. एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेत पारोळा शहरातील तेजस विश्वास चौधरी व सुजता प्रदीप चौधरी हे दोघे भाऊ बहीण 82.67% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब यु.एच.करोडपती सर संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर संस्थेचे मुख्याध्यापक प्राचार्य विजय बडगुजर व शिक्षक शिक्षकेतर वृंद व पारोळा शहर तेली समाज कार्यकारणी व इतर सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.