जळगाव : प्रतिनिधी
बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कमलाकर फडणीस यांनी सांगितले की,प्रबोधचंद्रिकेचे तत्कालीन संपादक वा. ना. फडणीस यांनी सावरकरांची चाळीसगाव ते जळगाव रेल्वे प्रवासात मुलाखत घेतली होती. सावरकरांची काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून सुटका झाल्यावर विशेषांक त्यांनी काढला होता. तो भगूर येथील तात्यारावांच्या जन्मस्थळी शोकेसमध्ये ठेवलेला आहे.
अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांनी हिंदुत्ववादींसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या सावरकरांचे नाशिक जिल्ह्यातील जन्मस्थळ भगूर येथे आगामी काळात भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. सहलीचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी नियोजन समितीला केली. महिला मंडळ अध्यक्षा मनीषा दायमा आदी उपस्थित होते.