यावल सुरेश पाटील
भुसावल यावल रोड वर तापी नदी पुलाजवळ बंद असलेले टोलनाका वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत असून याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेतुता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण भुसावळ विभागासह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यातील वाहनधारकांकडून होत आहे.
भुसावळ जवळील तापी नदी पुलाचे रुंदीकरण झाल्यानंतर फैजपुर -भुसावळ आणि यावल भुसावळ तसेच भुसावळ कडून फैजपुर सावदा रावेर बुऱ्हाणपूर आणि भुसावळहुन यावल चोपडा शिरपुर अमळनेर नंदुरबार इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या जड वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात होता परंतु गेल्या चार पाच वर्षापासून टोलनाका बंद अवस्थेत असल्यावर सुद्धा त्या ठिकाणी टोल नाकासाठी बांधकाम केलेल्या खोल्या जैसे थे आहेत या ठिकाणी रस्ता व साईड पट्ट्या नादुरूस्त झालेल्या असल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांना वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, बंद असलेले टोलनाक्याच्या बाजुने असलेल्या अतिक्रमणास या आडून सुरक्षा दिली जात असल्याची चर्चा होत आहे. यामधुन बांधकाम विभागाचे काही लोकांची आर्थीक तडजोड असल्याचे बोलले जात आहे. याप्रकाराकडे वरिष्ट अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन टोल नाक्या ठिकाणी झालेले संपूर्ण बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ काढून घ्यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.