बंडखोरातले १६ आमदार लवकरच माघारी येणार ; ठाकरे गटाचा दावा

0
57

मुंबई : गुवाहाटीतील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर गटातील १५ – १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. पण ठाकरे गट हा दावा करत असला तरी प्रत्यक्षात हॉटेलमध्ये सर्व आमदार एकत्रितपणे मजेत राहत असल्याचे अनेक व्हिडीओ व छायाचित्र आले आहेत.

सोमवारी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आमच्या संपर्कात नसलेल्या दुसऱ्या गटातील आमदार पळून गेलेले आहे. त्यांच्यामध्ये परत येण्याचे धाडस आणि नैतिकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृतीमुळे चोवीस तास काम करणे शक्य नव्हते, तरीही ते काम करत होते. त्या काळात हे षडयंत्र रचलं गेले.

ज्यांना पुन्हा परत यायचे आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहे. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर पदाचे राजीनामे देऊ आमच्यासमोर उभे राहून दाखवावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी केले. फ्लोअर टेस्ट आधी त्यांना नैतिकतेची टेस्ट द्यावी लागेल, असे ते म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here