Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»बँक ऑफ बडोदा देतेय स्वस्त सुंदर घर
    राज्य

    बँक ऑफ बडोदा देतेय स्वस्त सुंदर घर

    SaimatBy SaimatMarch 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, प्रत्येक जण घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहातो. अशावेळी जर तुम्हाला तुमचे ड्रीम होम स्वस्तात मिळाले तर तुमचा आनंद दुप्पट होऊ शकतो. घर खरेदी करू पहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशीच संधी बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) उलब्ध करून दिली आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने बँकेकडे गहान असलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव येत्या 24 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही देखील या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या हक्काचं घर किंवा दुकान खरेदी करू शकता. 24 मार्चला बँक ऑफ बडोदाच्या वतीने थकबाकिदारांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होऊन तुम्ही देखील तुमच्या बजेटनुसार बोली लावू शकता. बँकेची ही संपत्ती वेगवेगळ्या राज्यात आहे. त्यामुळे बोली लावण्यापूर्वी तुम्ही एकदा बँकेच्या वतीने संपत्तीच्या विवरनाबाबत जारी करण्यात आलेली लीस्ट एकदा आवश्य चेक करून घ्या.
    ‘या’ वेबसाईटवर मिळवा संपत्तीची संपूर्ण माहिती
    बँक ऑफ बडोदाकडून या लिलावाबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर माहिती देण्यात आली आहे. बँकेच्या वतीने येत्या 24 मार्च 2022 रोजी संपत्तीचा लिलाव करण्यात येणार असून, या लिलावात तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या लिलावात सहभागी होण्याचे आवाहन बँकेच्या वतीने ट्विटद्वारे करण्यात आले आहे. सोबतच ज्या संपत्तीचा लिलाव होणार आहे . त्या संपत्तीच्या विवरणासंदर्भात सविस्तर माहिती असलेल्याल वेबसाईटची लिंक http://bit.ly/MegaEAuctionMarch देखील बँकेंच्या वतीने देण्यात आली आहे.
    बँकेकडून कोणत्या संपत्तीचा लिलाव करण्यात येतो?
    बँकेकडून अशा सर्व संपत्तीचा लिलाव करण्यात येतो, जी संपत्ती लोकांनी बँकेकडे गहान ठेवून कर्ज घेतलेले असते. अनेक जण बँकेकडून सपत्ती गहान ठेवून कोट्यावधीचे कर्ज घेतात. मात्र पुढे काही अडचणींमुळे ते कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना एकदा दोनदा बँकेकडून संधी देण्यात येते. मत्र तरी देखील ते जर कर्जाची परतफेड करू शकले नाही, तर त्यांचा समावेश हा एनपीएमध्ये होतो. त्यानंतर बँक आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी संपत्तीचा लिलाव करते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.