बँकेतील कामे दोन दिवसात करा पूर्ण

0
24

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मार्च महिन्यात तुमचे जर बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या मार्च महिन्यात एक-दोन नव्हे तर बँकेला तब्बल 13 दिवस सुटी असणार आहे. बँक तेरा दिवस बंद राहणार असल्याने तुमच्या बँकेतील (Bank) कामाचा खोळांबा होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमची बँकेतील पेंडिग कामे लवकरात लवकर उरकून घ्या. जर मार्च महिन्यात तुम्ही बँकेत जाणार असाल तर आधी त्या दिवशी बँकेला सुटी नाहीना याची खात्री करा, आणि नंतरच बँकेत जा. मार्च महिन्यात 1 मार्च महाशिवरात्री, 6 मार्च रविवार, 12 मार्च दुसरा शनिवार, 13 मार्च रविवार, 18 मार्च धूलिवंदन, 20 मार्च रविवर, 26 मार्च चौथा शनिवार आणि 27 मार्च रविवार असे आठ दिवस महाराष्ट्रात बँका बंद असणार आहेत. तर याच काळात देशात एकूण तेरा सुट्या असणार आहेत. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) मार्च महिन्यातल्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
प्रदेशानुसार सुट्यांची विभागणी
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात येत असते. या यादीनुसार यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्रात तब्बल आठ दिवस बँकांना सुटी असणार आहे. आठ दिवस बँका बद्द राहणार असल्याने त्याचा परिणाम हा बँकिंग व्यवहारांवर होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या यादीनुसार मार्च महिन्यात एकूण तेरा दिवस सुट्या आहेत. मात्र यातील केवळ आठच सुट्या या राज्यातील बँकांना असणार आहेत. काही सुट्या या विशिष्ट भूभागापर्यंत मर्यादीत असतात.
मार्चमध्ये आठ सुट्या
आरबीआयकडून सुट्यांची यादी जाहीर करताना सरसकट केली जाते. मात्र यातील अनेक सुट्या या केवळ विशिष्ट क्षेत्रापूरत्याच मर्यादीत असतात. म्हणजे एखाद्या प्रदेशात जर एखादा कार्यक्रम किंवा त्या प्रदेशातील संबंधित नेत्याची जयंती असेल तर सुटी देण्यात येते. मात्र अशी सुटी ही दुसऱ्या प्रदेशात नसते. मात्र ज्या सुट्या कॉमन असतात जसे की प्रत्येक आठवड्याचा रविवार, दुसऱ्या आणि चौध्या आठवड्याचा शनिवार या सुट्या सर्व बँकांना समान असतात. या मार्च महिन्यात 1 मार्च महाशिवरात्री, 6 मार्च रविवार, 12 मार्च दुसरा शनिवार, 13 मार्च रविवार, 18 मार्च धूलिवंदन, 20 मार्च रविवर, 26 मार्च चौथा शनिवार आणि 27 मार्च रविवार असे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here