फैजपूर ता.यावल, प्रतिनिधी I मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम पिंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते शहराध्यक्ष प्रा.उमाकांत पाटील यांनी सलीम पिंजारी यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी मयूर मेढे, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, सचिव संजय सराफ तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण होले खजिनदार तसेच प्रा. राजेंद्र तायडे शाकीर मलिक, ईदु पिंजारी, जावेद काझी, कामिल शेख, राजू तडवी निलेश पाटील पुढील प्रमाणे कार्यकारिणी सदस्य आहे. यावेळी प्रा. उमाकांत पाटील यांनी आद्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. संजय सराफ यांनीसुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त करुन नवनिर्वाचित सरकार मान्य वार्ता पत्रकार फाउंडेशन संलग्न शाखा फैजपूर शहर पत्रकार संघ अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सलीम पिंजारी यांचे सर्व पत्रकार बांधवांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.