फैजपूर:प्रतिनिधी
माजी चेअरमन पांडुरंग दगडू सराफ यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त जागेवर वि का सोसायटीच्या संचालकांच्या बैठकीमध्ये मंगळवारी साामाजि कार्यात आवड असलेले राजेश विलास महाजन यांची चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक चंद्रशेखर चौधरी, मिलिंद वाघूळदे, अप्पा चौधरी, केतन किरंगे, नितीन नेमाडे,
मेघश्याम कोल्हे, संतोष मेढे, लतीका भंगाळे यांची उपस्थिती होती.