फैजपूर विविका सोसायटीत शेतकरी विकास पॅनलने बाजी

0
39

फैजपूर ता यावल: प्रतिनिधी
फैजपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या २०२२ ते २०२७  या पंच वार्षिक निवडणूक मतदान रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली ,शेतकरी पॅनलने एकूण १३ जागांपैकी ११ जागा जिंकल्या. माघारीनंतर १३ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ९ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी शेतकरी पॅनलचे ७ उमेदवार तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी ठरले.
या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष व विद्यमान तथा माजी नगरसेवक हक्क उतरल्याने या निवडणुकीने कृषी सहकार क्षेत्रातील सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत २७९ पैकी २५१ सभासदांनी मतदानाचा बजावला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
विजयी उमेदवार असे शेतकरी पॅनलचे चंद्रशेखर देविदास चौधरी (२००), माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ (१८६), नगरसेवक केतन डिगंबर किरंगे (१८९), अप्पा भालचंद्र चौधरी (१८०), जिल्हा दूध संचालक नगरसेवक हेमराज खुशाल चौधरी (१६३), काशिनाथ  डोंगर वारके (१६८), नरेंद्र पीतांबर चौधरी (१५८), तर अपक्ष नितीन नेमाडे (१९३) व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात संतोष मनिराम मेढे (१३०) हे विजयी झाले.तर पराभूत उमेदवारात  नगरसेवक देवेंद्र बेंडाळे (१५१), शरीफा रशिद तडवी (११०), रोहिदास भंगाळे (११५) समावेश आहे.
ओबीसी गटातून विलास महारु महाजन व महिला गटातून  नगरसेविका   शकुंतला मोतीराम भारंबे, माजी नगरसेविकाअनिता अरुण चौधरी, भटक्या विमुक्त जाती गटातून माधव हरी भोई हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. रविवारी मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल निवडणूक निर्णय अधिकारी एम. बी. गाढे यांनी घोषित केला. योगेश सूर्यवंशी, दामू पाटील, मनोज कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here