फैजपूर : प्रतिनिधी
कोरोना संसर्गाचे काटेकोर पालन करून कार्यालयीन कामकाज करतांना शासनाचे वेळोवेळी निघालेले आदेश, त्यांचे तात्काळ पालन, नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या त्या अनुषंगाने न्यायालयीन सुनावणी प्रक्रिया या कामकाजात प्रांत कैलास कडलक यांनी कर्मचार्यांसह स्वतःला झोकून दिले आहे. अशातच या कार्यालयातील जवळपास दहा पैकी सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या समस्या शोधून सोडवणे ही सुद्धा या अधिकार्यांना गरजेचे असून अत्यंत कठोर नियम पाळूनही कर्मचारी बाधित होत असल्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी आपणहून सतर्क राहून शासनाने दिलेले नियम पाळणे हेच आता गरजेचे असल्याचे प्रांत कैलास कडलक यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे. प्रत्येकाने मास्क लावावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, रुग्णांना घरीच कोरटाईन होण्यासाठी प्रांत कार्यालयाकडून परवानगी देण्याचे कामही सुरु आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. त्रास होत असल्यास तपासणी करावी असे आवाहन प्रांत कैलास कडलग यांनी केले आहे. आमोदा रस्त्यावरील मसाका जवळील कोविड सेण्टरला १४२ रुग्ण असून न्हावी ग्रामीण रुग्णालय येथे ३७ रुग्ण उपचार घेत आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित सरोदे यांनी दिली.