फैजपूर ता यावल l प्रतिनिधी
पंतप्रधान ना. नरेंद्र जी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या केंद्र सरकारची यशस्वी आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरसेवा, सुशासन, गरिबांचे कल्याण या पर्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यंत्री देवेंद्रजी फडणवीस ,भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री आ गिरीशभाऊ महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्यासह सर्व जिल्हाभरातील पक्षाचे सर्व आमदार प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.
जळगाव जिल्हा युवा मोर्चा च्या माध्यमातून आज यावल तालुक्यातील फैजपूर येथे विकास तीर्थ बाईक रॅली काढली होती भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात ह्या रॅली ची सुरवात केली.
भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅली सुरुवात झाली, सागर कोळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपा स्वच्छता समिती जिल्हा संयोजक माजी नगराध्यक्ष निलेश (पिंटूभाऊ) राणे ,युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष सागर चौधरी, उमेश बेंडाळे न्हावी,भुषण नेहेते, ता. सरचिटणीस योगेश खेवलकर , ता उपाध्यक्ष वैभव वकारे , प्रतीक वारके, हरिष होले, शरद तायडे,रजनीकांत पाटील, निलेश पाटील, प्रशांत सरोदे, जयेश चौधरी, सचिन पाटील, कोमल तळेले,नितीन सपकाळे,पंकज मोरे, सतीश कोळी, फैजपूर शहराध्यक्ष श्याम भंगाळे, मोहन होले, अक्षय परदेशी, अक्षय कोळी, प्रशांत तायडे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.