फैजपूरच्या आकाशची अमेरिकेतील आकाशात झेप

0
17

फैजपूर ता यावल : प्रतिनिधी
येथील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरिकेतील स्याडी यगो येथे आकाशात सुमारे १३५०० फूट उंचीवरून स्काय ड्रायव्हिंग करून एक चित्तथरारक यशस्वी कामगिरी केली आहे. ही अत्यंत धाडशी अशी ड्रायव्हिंग असून भारतीय युवकांना ही कामगिरी निश्चित प्रेरणादायी ठरेल.
आकाश हा युवक फैजपूर येथील दादा साहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांचा मुलगा आहे. आकाशने अमेरिकेत एम. एस. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून अमेरिकेत वास्तव्याला व उच्च सेवेत आहे. त्याने केलेल्या या धाडसी कामगिरीस आई वैशाली पाटील व वडील मनोजकुमार पाटील यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. या धाडसी कामगिरी बद्दल आकाश पाटील यांचे मसाका संचालक नरेंद्र नारखडे, डॉ. गिरीश लोखंडे, प्रा. डॉ. ए. के. जावळे, अमूल्य डहाणूकर, प्रा. डॉ. पद्माकर पाटील, अनिल नारखेडे, आद्योगिक वसाहत संचालक मंडळ, लक्ष्मी नागरी पतसंस्था संचालक मंडळ, चंद्रशेखर चौधरी, योगेश भावसार, नितीन राणे, भास्कर राव चौधरी, पंडित कोल्हे सर, शेखर चौधरी, भास्कर नारखेडे, भास्कर बोंडे, सुशिलशेठ जायसवाल, प्रा. उमाकांत पाटील, भूषण नारखेडे आदींनी अभिनंदन केले आहे.
ही कामगिरी करतांना विमानाने १३५०० फूट उंचीवर जाऊन विमानातून बलूनचे साहयाने बाहेर पडून अवकाशात झेप घेऊन स्काय ड्रायव्हिंग केली गेली. अत्यंत जीव धोक्यात घालून ही ड्रायव्हिंग करावी लागते. ही कामगिरी आकाश पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. पुन्हां एकदा भारतीय युवकाने आपला ठसा अमेरिकेत उमटवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here