फॅशन शो मध्ये आदिती गुरचलने  पटकावला प्रथम क्रमांक

0
85

 जळगाव ः प्रतिनिधी

शहरातील क्व्ोश्‍चन मार्क ब्रॅण्ड प्रस्तुत मिस्टर ॲण्ड मिसेस तसेच किड्स फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात लहान गटात वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील आदिती सुधीर गुरचल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

आदिती ही ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथील इंटक युनियनचे जेसीएम मेंबर सुधीर गुरचल यांची सुकन्या आहे.आदितीला प्रमुख पाहुणे गोपाल दर्जी,पवन टाक, सुशांत भावसार तसेच परीक्षक मुबंईचे शुभम जैन, उत्तराखंडचे दीपक उपरेती, प्रीती उपरेती, नाशिकच्या मुरण्मयी अकोलेकर, सिद्धार्थ अहिरे, जयश्री अहिरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकचे सन्मानचिन्ह व ‘मिस किड्सच्या किताब’ ने सन्मानित करण्यात आले. आदिती गुरचलचे सर्वत्र कौतक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here