प्रोषित महोम्मद पैगंबरांवर वादग्रस्त विधान करणाऱ्यांना तात्काळ अटक करा

0
20

लोणार(शेख गुलाब)

नुपूर शर्मा, दिल्ली (माजी प्रवक्ता भाजप ) ह्यांनी टाईम्स नाव, या चैनलवर “न्यूज हावर डिबेट कार्यक्रमात” इस्लाम, प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्याच्या तत्त्वांवर टिप्पणी करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले व प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द
वापरले. ह्या टिप्पण्यांमुळे देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो असे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. नवीन कुमार जिंदल,
(भाजपचे माजी मीडिया प्रमुख, दिल्ली सर्कल) यांनी १ जून २०२२ रोजी भारतातील मुस्लिम समुदायांना लक्ष्य करून प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात त्याच मुद्द्यावर टिप्पणी केली होती. नॅशनल टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतातील मुस्लीम समुदायांना लक्षकरून अशा निंदनीय टिप्पण्या करून धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने विधाने केली गेली आहेत आणि देशाच्या धर्मनिरपेक्षता विरोधात व धार्मिक हिंसा भडकवण्यासाठी अशी विधाने  केली असल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर गंभीर प्रकरणाची दखल घेत भाजप ने नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्यावर ०५ जून
२०२२ च्या एका आदेशाद्वारे निलंबनाची कारवाई केलीली आहे परंतु कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आले नाही असे तक्रारीत उल्लेख करण्यात आले आहे. शुक्रवारी लोणार येथील सर्वमुस्लिम बांधवांनी आपल्या स्वतःचे दुकाने बंद ठेवून या बाबत विरोध प्रदर्शित केले. प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात कोणतीही टिप्पणी मंजूर नसल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही व्यक्तीं विरुद्ध योग्य कलमांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करणे तसेच टाइम्स नाव चॅनलवर सुद्धा सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील
युक्तिवाद प्रसारित केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आलेली आहे. यावेळी लोणार शहरातील बहुसंख्ये मुस्लिम बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here