प्रियकराने पाठविले नवरदेवाला नवरीचे खाजगी फोटो

0
18

मुंबई : वृत्तसंस्था
अचानक वरपक्षाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला…ही कोणच्या सिनेमाची कहाणी नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने मुलीला लग्नासाठी नकार दिला. यामागील कारणंही तसं धक्कादायकच होतं.
लग्न ठरलेल्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडने नवऱ्या मुलाला मुलीचे काही पर्सनल फोटो पाठवले. यानंतर नवऱ्या मुलाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला.

ही घटना युपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे. 23 मे रोजी टिळक कार्यक्रम झाल्यानंतर 25 मे रोजी वरात येणार होती. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. मात्र मुलाकडून लग्नाचा नकार येताच सर्वांच्या आनंदावर पाणी फिरलं.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न ठरलेल्या मुलीचं गावातील एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हा मुलगा सतत नवऱ्या मुलाला फोन करून लग्नासाठी नकार द्यावा म्हणून दबाव टाकत होता. मात्र नवऱ्या मुलाने त्यांच्या या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं.
मात्र 25 मे रोजी म्हणजे लग्नाच्या दिवशी मुलाने वराला व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्या मोबाईलवर वधूचे काही खाजगी फोटो दाखवले. अशा परिस्थितीत संतापलेल्या मुलाने लग्नासाठी नकार दिला.

जेव्हा या घटनेची माहिती मुलीच्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांनी मुलाच्या घरच्यांशी समजूत घातली. मात्र वराला ते मान्य नव्हते. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आणि दोन्ही बाजूंची पंचायत बसली, मात्र कोणताही निकाल न लागल्याने लग्नकार्य थांबवण्यात आलं.

लग्नाचा निर्णय घेण्यासाठी वराने 15 दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांच्याकडे तक्रार आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here