साईमत, प्रतिनिधी, जळगाव
येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण वसंतराव पाटील यांना राष्ट्रीय सामाजिक कला साहित्य एकता संमेलनात क्रीडा पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक राष्ट्रीय कर्तृत्व सन्मान पुरस्कारने सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी डॉ.कांशिराम धोंडगा, विनोद ढगे, गणेश अमृतकर, राजेश जाधव हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्ल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुदर्शन पाटील. डॉ.रितेश पाटील, पिपल्स बॅक संचालक विकास वाघ, ॲड. अविनाश भालेराव, संजय जडे यांनी अभिनंदन केले आहे.
