प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीससह दोघांना अटक

0
14

अलिबाग, वृत्तसंस्था । रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. बदनामी करण्याच्या हेतूने बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेला अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदार महिलाही उमेश ठाकूर यांच्या कटात सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणाऱ्याचा काटा काढण्यासाठी त्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. या फेक सोशल अकाऊंटवरुन महिलेला अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठविण्यात येत होते. याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर सह शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here