मुंबई : प्रतिनिधी
तीन मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतोय. याधील एक तरुणी रस्त्यावर थेट पोलिसाची गच्ची पकडून गैरवर्तन करताना दिसत आहे. नशेमध्ये बेधुंद असलेली ही तरुणी पोलिसासोबत उद्धटपणा आणि गैरवर्तन करत आहे. मात्र, दुसरीकडे आपलं कर्तव्य बजावणारा पोलीस या मद्यधुंद तरुणींना समजावतोय. आता या व्हिडीओमध्ये या मद्यधुंद तरुणींनी आधी ओला ड्रायव्हरसोबत शिविगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही जुमानलं नाही. अशा प्रकारे पोलिसांशी गैरवर्तन करणे, त्यांच्याशी नशेत हुज्जत घालणे, त्यांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जाणे, या मुंबईत सुरू आहे. मुंबई पोलीस अहोरात्र मुंबईकरांच्या सेवेत असतात. चोवीस ते आठ्ठेचाळीस तास ते आपली सेवा बजावतात. मात्र, त्यांच्यासोबत अशा प्रकारे गच्ची पकडण्यापर्यंत मजलं जात असेल तर कारवाईला इतका उशिर का व्हावा, असा प्रश्न आता थेट मुंबईकर (Mumbai) विचारतोय.
नेमकं प्रकरण काय?
मद्यधुंद अवस्थेतल्यातीन तरुणींचा व्हिडीओ झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसतायेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत. या घटनेचा व्हिडीओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केलाय. या व्हिडीओमध्ये पोस्ट करुन ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना आवाहन केलंय की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. व्हिडीओच्या शेवटी मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी देखील वाद घालताना दिसत आहे.
…तरीही बजाविल्या पोलीस कर्तव्य
मुंबई पोलिसांचे काम सर्वांना माहित आहे. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सेवेत मुंबई पोलीस अहोरात्र असतात. मुंबईकरांनाही याचीक जाण आहे. मात्र, मुंबईतल्याच या मद्यधुंद तरुणींना केलेला उपद्याप आणि घातलेला हैदोस गंभीर आहे. मुंबई पोलिसांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जातीच कशी, इतकी हिंम्मत येती कुठू, मुंबईसाठी जागणाऱ्या, कोणत्याही वेळी धावून येणाऱ्या पोलिसांसोबत अशा पद्धतीने गच्ची पकडण्याची केलीली हिम्मत आता मुंबईकरांच्याही डोक्यात गेली आहे. या तिन्ही गैरवर्तन करणाऱ्या तरुणींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.
कायदा मोडने चुकीचंच
यापूर्वी देखील अशा प्रकारे कायदा मोडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मद्य प्रशान करुन रस्त्यावर हुज्जद घालणाऱ्यांवर कारवाई केल्याचेही प्रकार आहेत. आता या प्रकरणात मुंबई पोलीस काय कारवाई करतात, ते पहावं लागेल, ओला ड्रायव्हरने या प्रकरणात कारवाईच्या केलेल्या मागणीची दखल घेतली जाते का, ते येत्या काळातच कळेलं.