‘पॉपुलर`चे ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात निदर्शने

0
31

जळगाव ः प्रतिनिधी

पॉपुलर फ्रंट या संघटनेवर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात संघटनेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
ईडीने संघटनेचे देशभरातील सर्व बँक खाते अनिश्चित काळासाठी गोठविली आहेत. याचा निषेध करण्यात आला. गेल्या काही वर्षात संघटनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जात आहे. त्याचाच हा एक भाग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ईडीने पॉपुलर फ्रंटच्या बँक खात्याचा मागील 13 वर्षांची तपासणी केली आहे. ज्यामागे संघटनेला टार्गेट करणे हा हेतू असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. पॉपुलर फ्रंट लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या सर्वांनी भाजपा नेतृत्वातील केंद्रातील सरकारच्या लोकशाही विरोधी कृतीचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी झाकी पटेल, तनझीर सैय्यद, दिलनवाज सैय्यद, सोहिल बिसमील, साकीब देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here