पेशावरमध्ये आत्मघातकी स्फोट; 36 ठार तर 50 हून अधिक जखमी

0
39

पेशावर, पाकिस्तान :
पुन्हा एकदा दहशतवादानं पाकिस्तानला आपल्या निशाण्यावर घेतलंय. शुक्रवारी पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 36 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय.
पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या (जुमा) नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं गर्दीच्या मध्यभागी स्वत:ला स्फोटकांनी उडवून घेतलं. या स्फोटाच्या झळा अनेक कुटुंबांपर्यंत पोहचल्यात.
या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानची सर्व मदत पथकं घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here