नवी दिल्ली, प्रतिनिधी । सरकारी तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) साठी नवे दर जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज (सोमवार) म्हणजेच, 13 सप्टेंबर रोजी पेट्रोल-डीझेल दोन्ही इंधनांच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किमती स्थिर आहेत. देशभरात आजही पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक उंचीवर आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. घरगुती बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नसला तरी अद्यापही किमती उच्चांकी पातळीवर आहेत.
देशातील प्रमुख शहरांतील दर :
शहर पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली 101.19 88.62
मुंबई 107.26 96.19
चेन्नई 98.96 93.26
कोलकाता 101.62 91.71
भोपाळ 109.63 97.43
रांची 96.21 93.57
बंगळुरु 104.70 94.04
पाटना 103.79 94.55
चंदिगड 97.40 88.35
लखनौ 98.30 89.02
नोएडा 98.52 89.21
सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती
सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल -डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे.
जुलै महिन्यातील वाढ
जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमती त काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.