जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरातील गावठी पिस्तूल घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयित आरोपी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंप्राळा परिसरातील मढी चौकातील निलेश चंद्रकांत ठाकूर (वय-२७) उर्फ ‘सुपड्या’ हा तरूण हातात गावठी पिस्तूल घेवून परिसरात दहशत पसरविण्यात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सपोनि जालिंदर पळे, पो.ना. प्रितमकुमार पाटील, विजय पाटील यांनी बुधवार ४ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी निलेश उर्फ सुपड्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून २० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.
याबाबत पो.ना. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ सुशील चौधरी करीत आहे.
