भुसावळ ः प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अभियंता असलेल्या युवक शेतकऱ्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले आहे. गुणवत्ता चांगली असल्याने त्याने थेट अबुधाबीच्या बाजारात केळीची निर्यात केली आहे.
पिंप्रीसेकम येथील निलेश पाटील या तरुणाने दीड एकरावर केळीची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीर येथे 300 क्विंटल केळी पाठवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अबुधाबीच्या बाजारात 150 क्विंटल केळीची निर्यात केली आहे. निर्यातक्षक केळी असल्याने त्यांना स्थानिक बाजारपेक्षा दुप्पट म्हणजे 1200 रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे.
निलेश पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून केळीची लागवड करीत आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन असल्याने त्यांनी केळी निर्यातीचा निर्णय घेतला. स्थानिक निर्यातदारांनी साठी सहकार्य केले. केळी निर्यातीमुळे शेतकरी देखील विदेश बाजारातील संधी बघून केळी लागवडीसाठी पुढे येत आहे.