पहूर,ता.जामनेर प्रतिनिधी(विठ्ठल चव्हाण)-
येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथील ग्रामपंचायत हद्दीतील इलेक्ट्रिक खांब तसेच हायमास्ट लँप वरील पथदिवे हे गेल्या २ वर्षापासून बंद आहेत.यामुळे गावात रात्रीच्या वेळी अंधार राहत असून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की,पिंपळगांव कमानी,ग्रामपंचायत हद्दीमधे हायमास्ट लँप(पथदिवे) सह एकूण २०-२२ इलेक्ट्रिक खांब आहेत त्यापैकी फक्त ३ खांब्यावरील पथदिवे सुरु असून बाकी सर्व बंद अवस्थेत पडले आहेत.याविषयी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे माजी प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,ग्रामपंचायत चे उपसरपंच-संदिपभाऊ राठोड,ग्रामपंचायत सदस्या-अनुसया चव्हाण,कैलासभाऊ चव्हाण,यांनी येथील ग्रामपंचायत चे सरपंचसाहेब यांना या दिव्यांची दुरुस्ती कधी करणार हे विचारले असता त्यांनी आज-उद्या करीत आणि ग्रामसेवक हे गावात उपस्थित नसतात असे प्रश्न उपस्थित करुन आजपर्यंत या विषयाकडे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेल्या फेब्रुवारी-२०२० मधे पिंपळगांव कमानी,ग्रामपंचायत ची निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत या गावात एकही सार्वजनिक काम झालेले नाहीत.उदा.-पाणीपुरवठा करणारी विहीर चे बांधकाम करुन या विहीर ची उंची वाढवून त्यावर संरक्षक जाळी बसविण्याचा ठराव गेल्यावर्षी पहिल्याच मासिक सभेत पारीत झालेला असताना सुद्धा या विहीरीचे अजून काम हाती घेतलेले नाही.तसेच ग्रामपंचायत इमारतीचे लाईन फिटिंग चे काम करून सहा महिने झाले असून बिल पूर्ण आदा करण्यात आले आहे , मात्र काम अर्धवटच! कारण सर्व इमारतीच्या खोल्यामध्ये आतापरेंत पंखा बसविण्यात आलेले नाही. या बाबतीत आज उपसरपंचा सह सर्व ग्रामपंचायत संदेश्यांनी चर्चा करून जो कोणी दोषी असेल या कामात हलगर्जी पणा करणारा त्याच्या वर कठोर करावी करण्यात यावी. असे पहूर पोलीस स्टेशन ला येत्या एकदोन दिवसात तक्रार दाखल करण्यात एणार आहेत.या कामा संबंधित जो कोणी कॉन्ट्रकदार असेल त्यांनी ग्रामपंचायत ला येऊन आपली समशः काय आहे ते कळवावे असे सर्व संदेश्यांनी आव्हान केले आहे.
सरपंचसाहेब आणि ग्रामसेवक यांंच्यात असलेल्या दुराव्यामुळे या गावाचा विकास रखडलेला आहे.गावातील ग्रामस्थांनी व स्वतः अशोकभाऊ चव्हाण यांनी या दोघांमधे समेट घडविण्याचा प्रयत्न केला असता तोही वरील न झालेल्या कामांवरुन निष्फळ ठरलेला आहे.
या विषयाकडे जामनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि गावातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे नम्र आवाहन वजा विनंती गावातील स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनि केली आहे.
जर येणाऱ्या पावसाळ्यापुर्वी गावातील पथदिवे दुरुस्ती आणि पाणीपुरवठा विहीर चे काम झाले नाही तर,गावात काही घटना घडल्यास स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास आणि पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील.आणि जर वरील विषय लवकर न सोडविल्यास-माजी ग्रामपंचायत सदस्य तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,माजी ग्रामपंचायत सदस्य-योगेशभाऊ राठोड,विद्यमान उपसरपंच-संदिपभाऊ राठोड,ग्रामपंचायत सदस्य-कैलासभाऊ चव्हाण, सदस्या-सईबाई चव्हाण,अनुसया चव्हाण,तारावंती राठोड,माजी सरपंच-अर्जुनभाऊ राठोड,समाजसेवक-संजयभाऊ राठोड,यांंच्यासह राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे पदाधिकारी-गणेशभाऊ राठोड,विकासभाऊ चव्हाण,प्रविणभाऊ चव्हाण,बबलू राठोड,एकनाथ चव्हाण,गोपाल चव्हाण,निलेश राठोड,चेतन राठोड,अरविंद चव्हाण,भारतभाऊ चव्हाण,यांंच्यासह असंख्य ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.