पाळधी येथे ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे शरद पवारांचे जंगी स्वागत

0
38

पाळधी ता. धरणगाव : प्रतिनिधी 
दिवंगत आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी जिल्हा दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचे येथे ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे अतिशय जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात आतषबाजीत शरदराव पवार यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पवार साहेबांचे स्वागत केले. याप्रसंगी परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांदसर येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी सुमारे साडेदहा वाजता शरदराव पवार यांचे पाळधी येथील मुख्य चौकात आगमन झाले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपस्थितांनी महाविकास आघाडीच्या जयजयकारासह जय भवानी, जय शिवाजी या घोषणेचा जयघोष केल्याने वातावरण दणाणून निघाले. पवार साहेबांनी ना. गुलाबराव पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यानंतर त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांना आपल्या वाहनात घेऊन चांदसरकडे प्रयाण केले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह वाढदिवस परिसरातील सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन शिवसेना व महा विकास आघाडीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here