पाळधीत पालकमंत्र्यांनी शिधापत्रिकांचे केले वाटप

0
27

पाळधी ता.धरणगाव ः वार्ताहर
येथील 30 गरजू कुटुंबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप करण्यात आले. उपक्रम जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ एका आठवड्यात या शिधापत्रिका गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या.

या वेळी धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, सहकारी गणेश पवार यांचे सहकार्य लाभले.या वेळी चांदसरचे सरपंच सचिन पवार, शरद कोळी, भूषण महाजन, गोपाळ सोनवणे यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here