पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यृ

0
26

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील शनिपेठ परिसरातील काट्या फैल येथे 38 वर्षीय महिलेचा घरात पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी घडली. याबाबत शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील शनिपेठ परिसरातील काट्या फैल येथील मोना इम्रान सैय्यद (वय 38) यांचा घरात काम करत असतांना पाय घसरुन डोक्यावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी सकाळी घडली. त्यांना लागलीच परिवाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हलविले असता महाविद्यालयाचे डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना मयत घोषित करून शनिपेठ पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा तपास पोलिस हवालदार अमोल विसपुते करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here