प्रतीनिधी : अमीन पिंजारी
कजगाव ता भडगाव सध्या उन्हाचे तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मनुष्यासह प्राण्यांच्या जिवाचीही लाहिलाही होत आहे त्यातच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
सध्या उन्हाचे तापमान पाहता मनुष्य आपली व्यवस्था करून घेतो मात्र वनात फिरणारे वन्य प्राण्यांना वन विभागाच्या हद्दीत व वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या बऱ्याच ठिकाणी पाणवठे आढळून येत नाही त्यामुळे वन्य प्राण्यांना गावालगतील शेतात येऊन आपली तहान भागवून घ्यावी लागत आहे मात्र पाण्यासाठी प्राण्याची होणारी वाताहतमुळे प्राणीप्रेमी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे पाणवठे तयार करण्यात यावे अशी मागणी जोरदार होत आहे
“””:सामाजिक राजकीय संघटनेने पुढे यावे
वाढत्या उन्हामुळे पाणी मिळत नसल्याने वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणवर होत असलेले हाल त्वरित थांबवावे अशी मागणी प्राणी प्रेमी नागरीकांच्या वतीने होत आहे तसेच पाणी मिळत नसल्याने अनेक प्राणी गावालगत असलेल्या शेत शिवारात येऊन आपली तहान भागवत असल्याने त्यांची भटकंती त्वरित थांबवावी त्यासाठी सामाजिक राजकीय संघटनेने पुढे येऊन ठिकठिकाणी पाणवठे बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोरदार होत आहे