कलजगाव ता.भडगाव : अमीन पिंजारी
ऑनलाईन प्रणालीचा घोळ वीज वितरण चे बिल वसुली चे उद्दिष्ट या धोरणामुळे कजगाव सारख्या मोठ्या गावाचा पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांचा पाणीप्रश्न उभा ठाकला असल्याने वीज वितरण बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन महिला सरपंच ला सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सरपंच वैशाली पाटील केला आहे.
बाबत वृत्त की शासन निर्णया नुसार ग्रामपंचायत चे खाते हे राष्टीयकृत बँकेत उघडण्यात येऊन तेथूनच ऑनलाईन प्रणाली द्वारे व्यवहार करण्यात यावे या साठी आयसीआय बँकेत खाते उघडण्या बाबत चे फर्मान शासनाने दिल्याने ग्रामपंचायत चे खाते आयसीआय बँकेत उघडण्या बाबत ची प्रक्रिया पुर्ण झाली मात्र खाते कार्यान्वित करण्या साठी तसेच सुरू असलेले खाते बंद करण्यासाठी वेळ लागत असतो त्यात काहि तांत्रिक अडचणी मार्च एन्ड मुळे बँकेत वाढलेला व्यवहार या मुळे अनेक अडचणी यात येत असल्याने कजगाव ग्रामपंचायत चे आयसीआय बँकेत उघडण्यात आलेले खाते अद्याप कार्यान्वित न झाल्याने वीज वितरण चे पाणी पुरवठा चे देय बिल हे केवळ ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित न झाल्याने खात्यात पैसे शिल्लक असल्या नंतर देखील भरता न आल्याने वीज वितरण ने दि.२४ रोजी कजगाव पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने कजगाव सारख्या मोठ्या गावास वीज वितरण कंपनी ने वेठीस पकडले आहे.
सरपंच वैशाली पाटील यांनी वीज बिल भरण्यासाठी केवळ ऑनलाइन प्रणालीची अडचण येत असल्याचे सर्वच स्थरावर कळविले होते या बाबतीत पंचायत समिती, विजवीतरण कार्यालय याना बिल भरण्यासाठी येणारी अडचण कळविली होती ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित होताच वीज वितरण चे देय बिल ऑनलाईन खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र कजगाव च्या सरपंच यांनी मांडलेल्या अडचणीकडे दुर्लक्ष करत सरळ कजगाव पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करत महिला सरपंच ला वेठीस धरण्याचा प्रकार वीज वितरण कंपनी ने केला असल्याचा आरोप सरपंच वैशाली पाटील यांनी केला आहे.
प्रतिक्रिया
ग्रामीण भागात काहि ठीकाणी राष्टीयकृत बँका आहेत मात्र त्या ऐवजी आयसीआय बँकेत खाते उघडण्या बाबतचे फर्मान शासनाचे आल्याने महिला सरपंच ला प्रत्येक वेळी गावावरून शहरात जाऊन बँक व्यवहार चा सोपस्कार पार पाडणे कठीण होणार आहे कारण ग्रामीण भागातुन आयसीआय बँक शाखेचे अंतर वीस ते चाळीस किलोमीटरवर आहे साठी शासनाने ज्या गावात राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या गावातच ग्रामपंचायत चे खाते सुरू ठेवावे अशी मागणी कजगाव च्या सरपंच वैशाली पाटील यांनी केली आहे.